#जागतिकआदिवासीदिन
८०-ते ९० शाळांचा प्रवास ..त्यातून 2 शाळा,ज्या शाळेत आदिवासी ची मुलं मुली स्वतंत्रपणे शिकत आहेत..आणि विशेषतः एक आहे आश्रमशाळा आणि दुसरी अगदीच विरुद्ध अशी खाजगी शाळा.. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे अगदी इंग्रजी माध्यमात शिकणारी ही मुलं आहेत बरं.. त्यामुळे इंग्रजीचा डंका फक्त आपणच वाजवतोय आणि गाजवतोय असं मुळीच गृहीत धरू नका.
बहुतेक वेळी बरेच जण मला विचारतात की तुझे अनुभव सांग.त्यामुळे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त दोन्ही शाळेंचे अनुभव सांगते ते ही एका वेगळ्या दृष्टिकोनानाने..
१.#आश्रमशाळा - मी स्वतः एका खाजगी शाळेत ते ही शहरात शिकलेली मुलगी.. आजोळी सगळे शिक्षक मंडळी त्यामुळे आश्रमशाळा फक्त ऐकण्यात येत असे प्रत्यक्ष मी कधीही गेलेली नव्हते..पण नेहमी प्रमाणे माझ्या कामानिमित्त योगायोग आलाच..मनात बरेच प्रश्न घेऊन तिथे पोहचले..रामोशी ही एक जमात असलेलं गाव तेही डोंगराच्या पायथ्याशी जिथे रस्ता संपतो.. गावाची लोकसंख्या जेमतेम..आश्रमशाळेचा मोठा परिसर पाहून खूप प्रश्न मनातून निघून गेले.. मुलं मुली कुतूहलाने पाहू लागली.खूप छान स्वागतही झालं.मग समुपदेशनाला सुरुवात झाली..आश्रमशाळेत बहुतेक मुलं मुली ही आदिवासी जमातीची आहेत.आई वडिलांपासून लांब राहून स्वतःच शिक्षण घेत आहेत. कधी कोणी वाढदिवस किंवा इतर गोष्टीनिमित्त त्याना कपडे,शैक्षणिक साहित्य, खेळाचे आणि आरोग्याचे साहित्य त्यांना वाटप केले जाते. मुख्य मुद्दा असा की आश्रमशाळेत १०वी पर्यंत शिक्षण घेता येते त्यानंतर क्वचितच त्यांना पुढे शिकवलं जातं.पण नंतर शिकवतील की नाही हा विचार न करता मुलं मुली १० वी पर्यंत का होईना बिनधास्तपणे आणि जिगरीने शिकतात.. नुसतं शिकत नाही तर ते खेळात, नाचण्यात, गाण्यात आणि इतर अभ्यासात देखील हुशार असतात..आणि त्यांचे पालक ही मुलांना शिकण्यास प्रोत्साहन करीत असतात.
2. #खाजगीशाळा - मी ज्या शाळेत गेले होते ती खाजगी आणि फक्त मुलींची शाळा आहे.या शाळेत आदिवासी मुलींना अनुदान देऊन इंग्रजी माध्यमातून शिकविले जाते, ते ही निःशुल्क. या मुली पालकांपासून लांब शाळेत होस्टेल मध्ये राहतात. त्यामुळे त्या अगदीच बिनधास्त पणे अभ्यास,कलागुण,स्पर्धा ,खेळ प्रत्येक गोष्टीत निपुण आहेत. विशेष म्हणजे त्यांचा एक Swag पण आहे बरं, या मुली घरच्यापासून लांब राहतात त्यामुळे यांचा boycut करण्यात येतो जेणेकरून स्वतःचा वेळ ही वाचतो आणि कुणावर अवलंबून ही राहता येत नाही . इथपासून या मुलींना शिक्षण दिले जाते.. या मुलींना पडणारे प्रश्न हे ही त्यांच्या शिक्षणाचा एक भाग आहे. त्यामुळे या मुलींमध्ये आणि पालकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास ही जागृत झालेला दिसतो..
मी पाहिलेला आदीवासी हा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा..निसर्गालाच देव मानणारा..परंपरा जपणारा, खूप साऱ्या सुप्त गुणांना मर्यादित ठेवणारा .. पण मी , आदिवासी हा स्वतःच्या मुलांना शिकवणारा ही पाहिलाय.. कारण हक्क त्यांना ही आहे शिकण्याचा नाही का?? कदाचीत, येत्या काही वर्षात आपल्याला आदिवासी हा शिकणारा आणि शिकवणारा दोन्ही ही पहायला मिळेल..!!🤗🌼
- प्राची झाडे 🕊️